Pakistan मध्ये आता पाणीबाणी; भारताने उचलले ‘हे’ पाऊल

173

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात पाकिस्तानसोबत (Pakistan) सिंधू जलवाटप करार झाला होता. त्यामध्ये रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण तर सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर पाकिस्तानचे नियंत्रण प्रस्थापित झाले होते. मात्र आता भारताने या करारामध्ये बदल करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस पाठवली. त्यामुळे आता पाकिस्तानची अडचण होणार आहे.

(हेही वाचा Lebanon Pager Explosion : लेबनॉन बॉम्बस्फोटात ९ ठार, २८०० हून अधिक जखमी)

करारानंतर परिस्थिती खूप बदलली

१९६० मध्ये भारत पाकिस्तानमध्ये (Pakistan) सिंधू जल वाटप करार झाला होता. यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयुब खान यांनी कराचीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. लोकसंख्येतील बदल, पर्यावरणीय समस्या आणि भारताचे उत्सर्जन लक्ष्य पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेच्या विकासाला वेग देण्याची गरज भारताने या नोटीसमध्ये मांडली आहे. करारानंतर परिस्थिती खूप बदलली असून पाणी वाटपामध्ये हे आताच्या परिस्थितीनुसार बदल करणे गरजेचे आहे. याचबरोबर सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांबाबतही या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. दहशतवादामुळे या कराराच्या सुरळीत कामकाजात अडथळा येत असल्याचे भारताने म्हटले आहे. 30 ऑगस्टलाच पाकिस्तानला (Pakistan) नोटीस बजावण्यात आली आहे. यावर पाकिस्तानकडून अद्याप काही उत्तर आलेले नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.