Nepal Earthquake : भारत नेपाळला शक्यतोपरी सर्व मदत करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

119
Nepal Earthquake : भारत नेपाळला शक्यतोपरी सर्व मदत करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Nepal Earthquake : भारत नेपाळला शक्यतोपरी सर्व मदत करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री ६. ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रुकुम पश्चिम डीएसपी नामराज भट्टराई यांनी पुष्टी केली की पहाटे ५ वाजेपर्यंत गोळा केलेल्या आकडेवारीनुसार ३६ मृत्यूची नोंद झाली आहे. नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. (Nepal Earthquake)

दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नोएडा, एनसीआरमध्ये भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर बिहारची राजधानी पाटणामध्ये लोक घराबाहेर पडले.  जजरकोट आणि रुकुम हे पश्चिम नेपाळमधील भूकंपग्रस्त भाग आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आणि ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.” तर आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना करतो\” असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६. ४इतकी नोंदवण्यात आली आणि भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये १० किमी आत होते.

(हेही वाचा :Australia Injury Update : विश्वचषकासाठी संघ मोठा हवा असं पॅट कमिन्सला का वाटतं?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.