इस्लामपासून दहशतवाद बाजूला करण्यासाठी सौदी आणि यूएईला भारताची साथ – राम माधव

भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला पाकिस्तान इस्लामच्या नावावर दहशतवाद पसरवत आहेत. त्यामुळे इस्लाम आणि दहशतवाद या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे चित्र जगभरात पोहोचत आहे. ते पुसण्यासाठी सौदी आणि यूएईने पुढाकार घेतला असून, इस्लामपासून दहशतवाद बाजूला करण्यासाठी या देशांना भारत सर्वतोपरी मदत करीत असल्याचे भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले.

पांचजन्यतर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी, २५ नोव्हेंबर रोजी फोर्ट येथील हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या सत्राला संबोधित करताना माधव म्हणाले, इस्लामोफोबिया ही संकल्पना केवळ पाकिस्तानमुळे अस्तित्त्वात आली. इस्लामच्या नावावर ते दहशतवाद पसरवत आहेत. भारतात १८ कोटी मुस्लीम शांततेत राहतात. इकडे कोणामध्ये इस्लामोफोबिया दिसत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे जगभरात इस्लामचा होणारा अपप्रचार थांबवण्यासाठी यूएई, सौदी यांसारखे देश पुढे आले आहेत. त्यांना भारत सर्वतोपरी मदत करीत आहे.

( हेही वाचा: पक्षाविरोधात निवडणूक लढवणा-या 12 बंडखोरांना भाजपचा दणका; सहा वर्षांसाठी केले निलंबित )

दहशतवादाचे अनेक छुपे प्रकार

  • राम माधव म्हणाले, दहशतवाद म्हणजे केवळ बंदूक घेऊन गोळ्या झाडणे नव्हे. त्याला पैसा पुरवणे, दहशतवादी कृत्यांना सहकार्य करणे यांसह अनेक छुपे प्रकार दहशतवादाच्या व्याख्येत मोडतात.
  • त्याचप्रकारे दहशतवादी कृत्यांना आळा घालणे, याचा अर्थ केवळ दहशतवाद्यांना मारणे नव्हे. तर दहशतवादाला मुळासकट संपवण्याची गरज आहे.
  •  त्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यामुळेच आता काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचे जीवनमान केवळ दोन महिन्यांचे उरले आहे.
  • त्यासाठी आम्ही इंटिलीजन्स व्यवस्था मजबूत केली. शिवाय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यातही आम्हाला यश आलेले आहे.
  • काश्मीरमधील नागरिकांमध्ये देशभावना जागृत केल्यामुळे तेथे आता अभूतपूर्व बदल घडत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here