2030 पर्यंत भारत-अमेरिका व्यापार दुप्पट होणार;ट्रम्प यांच्या भेटीनंतर PM Narendra Modi यांनी व्यक्त केला विश्वास

141

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत (Joint press conference) पंतप्रधानांनी सांगितले की, द्विपक्षीय चर्चेत अनेक करार झाले असून आगामी 2030 पर्यंत आपण भारत-अमेरिका व्यापार (Indo-US trade) दुप्पट असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तर ट्रम्प यांनी मोदीं उत्तम वाटाघाटीकार (Negotiator) असल्याचे सांगितले. (PM Narendra Modi)

संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यापारी संबंध वाढविण्याची ग्वाही दिली. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळ मिळेल आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेत्यांनी ‘मिशन ५००’ (Mission 500) समोर ठेवले आहे. याद्वारे २०३० पर्यंत एकूण द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून तो ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा उद्देश आहे. हे गाठण्यासाठी निष्पक्ष व्यापार अर्टीची आवश्यकता असेल, असे यात म्हटले आहे. २०२५ अखेरपर्यंत परस्पर लाभदायक, बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या (Multilateral Bilateral Trade Agreements) पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण करण्याची योजना जाहीर करण्यात आली. ही चर्चा पुढे नेण्यासाठी वरिष्ठ प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे.

(हेही वाचा – Human Trafficking च्या इकोसिस्टीमला संपवण्यासाठी भारत-अमेरिका एकत्र प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे विधान)

अडथळे दूर करण्यासाठी उपायांचे स्वागत

मुक्त व्यापार करारांमध्ये (FTA) दोन भागीदार आपापसांतील जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमाशुल्क (customs duty) काढून टाकतात किंवा कमी करतात. याशिवाय, ते सेवांमधील व्यापार वाढविण्यासाठी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नियम सुलभ करीत असतात. तसेच ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत व अमेरिकेने एका व्यापार करारावर चर्चा केली होती; ; परंतु मुक्त व्यापार कराराच्या बाजूने नसल्याने बायडन प्रशासनाने त्याला स्थगिती दिली होती. दोन्ही नेत्यांकडून व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी त्वरित केलेल्या उपायांचे स्वागत केले.

भारताला देणार एफ-३५ लढाऊ विमाने

भारत आणि अमेरिकेने १० वर्षाच्या संरक्षण भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्याची योजना आखली आहे. महत्वाच्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांच्या सहनिर्मितीसाठी दोन्ही देशांनी तयारी दर्शविली आहे. एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमानांसह (F-35 stealth fighter jet) अन्य संरक्षण सामुग्रीची अमेरिका भारताला विक्री करणार आहे. इंडो-पैसिफिक प्रदेशात भारत, अमेरिका लष्करी सहकार्य वाढविणार आहे.

भारताने केलेल्या उपायांचे कौतुक 

निवेदनानुसार, अमेरिकेने भारताने अलीकडे घेतलेल्या उपायांचे कौतुक केले आहे. भारताने मोटारसायकल, माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान उत्पादने आणि अमेरिकेच्या धातू उत्पादनांवरील शुल्क कमी केले होते. दोन्ही नेत्यांनी नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक संधी वाढविण्यावर सहमती दर्शविली.

(हेही वाचा – Mahakumbh 2025 मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून विनाव्यत्यय बँकिंग सेवा)

मोदी माझ्यापेक्षा उत्तम वाटाघाटी करतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे माझ्यापेक्षा अधिक उत्तम पद्धतीने चाटाघाटी करू शकतात अशी प्रशंसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. ट्रम्प हे आपले घनिष्ठ मित्र असल्याचे विधान पंतप्रधान मोदी यांनी याआधी केले होते. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी परस्परांबद्दल गौरवोदगार काढले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.