गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यात वाद सुरु आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर या वादाला सुरुवात झाली. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला, तेव्हापासून दोन्ही देशाचे संबंध कमालीचे ताणले गेले. यावेळी दोन्ही देशांकडून वेगवेगळे निर्णय घेतले गेले. मात्र आता भारताचा आक्रमक पवित्रा पाहून कॅनडाने अखेर माघार घेतली आहे. अचानक त्यांनी आपला सूर बदलला आहे.
अमेरिकेची साथ न मिळाल्याने कॅनडा नरमला
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (India vs Canada) यांना अमेरिकेची साथ न मिळाल्याने त्यांनी माघार घेतली आहे. काल म्हणजेच गुरुवार २८ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीदरम्यान अमेरिका हरदीप निज्जर हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून भारताला घेरेल अशी कॅनडाला आशा होती. मात्र असे काहीही झाले नाही. त्यामुळे अचानक कॅनडाचा सूर बदलला.
(हेही वाचा – India vs Canada : भारताचा महत्वाचा निर्णय; कॅनडाच्या नागरिकांना आता भारतात ‘नो एंट्री’!)
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली?
मॉन्ट्रियलच्या एका संमेलनात बोलतांना पंतप्रधान ट्रुडो यांनी “भारतासोबत (India vs Canada) चांगले घनिष्ट संबंध बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे विधान केले. पुढे बोलताना ट्रुडो म्हणाले की; “जून महिन्यात ब्रिटिश कोलंबिया इथं झालेल्या हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा हात होता या आरोपानंतरही कॅनडा आजही भारतासोबत घनिष्ट संबंध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. जागतिक पातळीवर भारताचे वाढते महत्त्व पाहता त्यांच्यासोबत कायम संबंध ठेवण्यासाठी आम्ही गंभीर आहोत, असं त्यांनी सांगितले. तसेच भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि शक्ती महत्त्वपूर्ण आहे. तसेच भारतानेही कॅनडासोबत (India vs Canada) यापुढे मिळून कामे करावीत अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
ब्रिटीश कोलंबियामध्ये १८ जूनला ४५ वर्षीय खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची (India vs Canada) गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या गुप्तहेरांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर भारत-कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले. भारताने २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप भारत सरकारने फेटाळून लावले. हा आरोप चुकीचा आणि खोटा असल्याचे भारताने (India vs Canada) म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community