शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना न्यायव्यवस्थेवर केलेली टीका भोवणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण संजय राऊत यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशनने अर्थात देशातील वकिलांच्या महत्त्वाच्या संघटनेने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही प्रतिवादी ठेवण्यात आले आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि इतर भाजप नेत्यांना न्यायव्यवस्था झुकते माप देते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
काय म्हणाले होते संजय राऊत
काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर बोट ठेवले होते. काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून कशी काय सुरक्षा मिळते? हे जे काही प्रकार सुरु आहेत त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि शंका आहेत. असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. न्यायव्यवस्थेमध्ये एका विचाराची लोक आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. न्यायव्यवस्था देत असलेला दिलासा हा एक घोटाळा आहे. असाही गंभीर आरोप राऊतांनी केला होता.
(हेही वाचा: आता एकाच पुस्तकात सगळे विषय; पाठ्यपुस्तकांचे ओझे होणार कमी )
राऊतांचे आरोप
- दिलासा घोटाळा न्यायव्यवस्थेला अलिकडेच लागलेला डाग आहे.
- दिलासा घोटाळा हा अल कायदा आणि कसाबपेक्षा भयंकर आहे.
- एकाच पक्षाचे ठग दिलासा घोटाळ्याचे लाभार्थी कसे असू शकतात.
Join Our WhatsApp Community