राष्ट्रपती म्हणाले… ही आनंदाची बाब! देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनतोय!

104

केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्नशील आहे. त्यानुषंगाने भारतीय संस्था कार्यरत असून तेजस फायटर जेट हा त्याचाच भाग असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. ते आज, सोमवारी संसदेपुढे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आभिभाषण करताना बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की, सर्व 33 सैनिक शाळांनी आता मुलींनाही प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे ही आनंदाची बाब आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीत (एनडीए) महिला कॅडेट्सच्या प्रवेशालाही सरकारने मान्यता दिली आहे. महिला कॅडेट्सची पहिली तुकडी जून 2022 मध्ये एनडीएमध्ये येईल, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

आत्मनिर्भर भारतातासाठी सरकार प्रयत्नशील

यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, मी त्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांना नमन करतो ज्यांनी त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आणि भारताला हक्क मिळवून देण्यासाठी मदत केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारताच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचेही मी आदरपूर्वक स्मरण करतो, असं राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले. आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने पुढच्या 25 वर्षात सर्वसमावेशक, सर्वहितकारक, आत्मनिर्भर भारतातासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले.कोरोनाने अनेक लोकांना आपल्यापासून हिरावून घेतले.या काळात काम करणाऱ्या सर्व फ्रंटलाईन वर्कर आणि नागरिकांचे राष्ट्रपतींनी आभार मानले.

काय म्हणाले राष्ट्रपती…

पद्म पुरस्कारात देशभरातील विविध भागातील विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले गेले, हे सरकार सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपतींनी सांगतले. कोरोनाच्या काळात अनेक देशात अन्नधान्याची कमी पाहायला मिळाले. परंतु 80 करोड लाभार्थ्य़ांना फायदा मिळाला. तसेच डिजिटल इंडियातही सरकारने प्रभावी काम केलं. कोरोनातही पेय जल 6 करोड लोकांना फायदा झाला तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत लोकांना फायदा झाला. कोणीही उपाशीपोटी घरी परतणार नाही याची खात्री करण्यासाठी, माझे सरकार दर महिन्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग म्हणून गरिबांना मोफत रेशनचे वाटप करते. आज भारत जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवत आहे; ती मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असं राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळातही देशाची निर्यात वाढली आहे. देश इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पुढे जावा म्हणून सरकारने 76 हजार करोडचं पॅकेज घोषित केलं आहे. सरकार पारंपारिक उद्योगांनासुद्धा प्रोत्साहन देत आहे. त्यातूनच मेगाटेक्सटाईल हब सुरु केले जात आहेत. लघू, सुक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत महत्त्वाचं काळात खादीउद्योगांनं महत्त्वाची भूमिका बजावली. 2014 नंतरच्या काळात खादी विक्रीत वाढ झाली आहे. रेल्वेचेही आधुनिकीकरण तसेच रेल्वे डब्यांचे आधुनिकीकरण चालू आहे. रेल्वेचे विद्युतीकरणही चालू आहे. सागरमाला योजने अंतर्गतही जलमार्गांच काम चालू आहे. त्यासाठी सरकारकडून काम चालू आहे.

(हेही वाचा – अजब निर्णय! बाळाला जन्म द्या अन् बोनसह वर्षभराची सुट्टी घ्या…)

देशातील रोजगार उपलब्धतेसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती सांगितले. अनेक दशकांपासून दुर्लक्षित भागांमध्ये पायाभूत सुविधांचे काम जोरात चालले आहे. त्याचा फायदा अनेक खेड्यांना होतोय. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्सप्रेस वे इत्यादींचं काम वेगाने चालू आहे. तसेच देशात 21 ग्रीनफिल्ड एअरपोर्टला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 24 राज्यात 111 जलमार्ग घोषित केले आहेत.देशातील 8 राज्यात 11 नवे राष्ट्रीय मार्ग घोषीत केले आहेत. कोणीही उपाशीपोटी घरी परतणार नाही याची खात्री करण्यासाठी, माझे सरकार दर महिन्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग म्हणून गरिबांना मोफत रेशनचे वाटप करते. आज भारत जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवत आहे; ती मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.