Indian Budget 2024 : भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो ते तुमच्या समोर आहे. माझा विरोधकांना सल्ला आहे फक्त नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका.  महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी मिळाल्या आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

188
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, २३ जुलै रोजी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प (Indian Budget 2024) हा भविष्याचा वेध घेणारा आहे, तसेच या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गाला फायदा होणार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.

काय म्हणाले फडणवीस? 

या अर्थसंकल्पात (Indian Budget 2024) आरोग्य क्षेत्रात खर्च दुप्पट केला आहे. तसेच सामाजिक कल्याणाच्या विकासाचा दरही वाढलेला आहे. सरकारने या दोन्ही क्षेत्रात दुप्पट गुंतवणूक केली आहे. त्याच बरोबर सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. .रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रामविकास क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. 11 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.  मुद्रा लोन 10 लाख वरून आता 20 लाख पर्यंत वाढवण्यात आलं आहे.
इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीय कुटुबांना फायदा होणार आहे. केवळ घोषणा न करता भविष्याचा वेध घेत ही घोषणा करण्यात आली. विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो ते तुमच्या समोर आहे. माझा विरोधकांना सल्ला आहे फक्त नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका.  महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी मिळाल्या आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प (Indian Budget 2024) शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याचे फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.