Congress : गोव्यात आमच्यावर संविधान जबरदस्तीने लादले; काँग्रेसचे उमेदवार विरिटो फर्नांडिस यांचे वादग्रस्त वक्तव्य

भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाली. १९६१ मध्ये गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला, तेव्हा तुम्ही आमच्यावर संविधान लादले. त्यात गोव्याचा समावेश नव्हता, असे विरिटो फर्नांडिस म्हणाले.

208

१९६१ साली पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोव्यात आमच्यावर भारतीय संविधान जबरदस्तीने लादण्यात आले, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे (Congress) दक्षिण गोव्यातील उमेदवार विरिटो फर्नांडिस यांनी केले. एका बाजूला काँग्रेस भाजपाच्या विरोधात प्रचार करताना भाजपाला संविधान बदलायचे आहे, देशात हुकूमशाही आणायची आहे, असे म्हणत असतानाच गोव्यातील काँग्रेसच्याच उमेदवाराच्या या वक्तव्यावरून काँग्रेस पक्ष उघड्यावर पडला आहे.

भारतीय राज्यघटना गोवावासीयांवर जबरदस्तीने लादण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराने केलेल्या टिप्पण्यांमुळे मी घाबरलो आहे. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे. यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी 14 वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे का? काँग्रेसने हे बेपर्वा भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवावे. काँग्रेस आपल्या लोकशाहीला धोका आहे.
– प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा 

राहुल गांधींना दुहेरी नागरिकत्वासाठी केलेली मागणी 

दक्षिण गोव्यातील एका कॉर्नर सभेला दक्षिण गोव्यातील कॉँग्रेसचे उमेदवार विरिटो फर्नांडिस संबोधित करताना, त्यांनी २०१९ च्या गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्याशी याविषयावर झालेल्या संभाषणाचा संदर्भ दिला. १९६१ साली गोवा स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय संविधान गोव्यावर जबरदस्तीने लादण्यात आले होते, असे आपण त्यावेळी राहुल गांधींना सांगितले होते, असे फर्नांडिस म्हणाले. फर्नांडिस त्यावेळी गोएंचो अवे  या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य होते. या संस्थेची गोव्यातील लोकांना भारतीय नागरिकत्वासोबत पोर्तुगालचेही दुहेरी नागरिकत्व देण्यात यावे, अशी मागणी करत आहे.

(हेही वाचा Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात शकुनी कोण?)

संविधान १९५० ला लागू झाले गोवा १९६१ला स्वतंत्र झाला होता 

आम्ही काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधींसमोर बारा मागण्या मांडल्या आणि त्यापैकी एक दुहेरी नागरिकत्वाची होती. गांधींनी मला विचारले की, ही मागणी घटनात्मक आहे का? आम्ही नाही म्हणालो, पण मी त्यांना समजावून सांगितले की, भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाली. १९६१ मध्ये गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला, तेव्हा तुम्ही आमच्यावर संविधान लादले. त्यात आमचा समावेश नव्हता, असे आपण म्हणालो होतो. फर्नांडिस म्हणाले की, राहुल गांधी यांचे आजोबा (जवाहरलाल नेहरू) यांनी गोवा स्वतःचे भवितव्य स्वतः ठरवेल, असे म्हटले होते, पण आमचे नशीब दुसऱ्याने ठरवले होते, असेही फर्नांडिस म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.