POK : पाकव्याप्त काश्मिरात कधीही तिरंगा फडकेल; केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा दावा

267

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नेतृत्व कणखर आहे. ठामपणाचे निर्णय घेण्याची त्यांची क्षमता पाहता एक दिवस तुम्ही सकाळी उठून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) भारताचा तिरंगा फडकतानाही पाहू शकता, असा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री निसीत प्रामाणिक केला.

काय म्हणाले केंद्रीय गृहराज्यमंत्री? 

जर काश्मीरमधून कलम 370 हटवता येऊ शकले, तेथील लाल चौकात तिरंगा फडकावत आला, हे सर्व पाहिल्यास एक दिवस सकाळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) तिरंगा फडकेल. देशाचे नेतृत्व सध्या दोन बलवान लोक करत आहेत. ते देशाच्या सन्मानासाठी आणि हितासाठी आवश्यक ते सर्व काही करू शकतात. भाजपा पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग मानते, हे अनेकांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतात सामील होईल का, हे मी सांगू शकत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्री काम करण्यापूर्वी काही बोलत नाहीत. कलम ३७० हटवण्याच्या २ दिवस आधीपर्यंत याबाबत कोणतीही माहिती नव्हती. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी ते निर्णय घेतात, असे प्रामाणिक यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा Sarathi : ‘सारथी’च्या चौकशी अहवालात दडलंय काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.