पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) भाषण करताना जाणीवपूर्वक काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भारताने शरीफ यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. भारतीय अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी पंतप्रधान शरीफ यांचे भाषण एक विनोद, दांभिकता होते, असे म्हटले.
भाविका मंगलानंदन म्हणाल्या, “आज सकाळी या यूएन (UN) मध्ये एक हास्यास्पद घटना घडली. मी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणातील भारताच्या संदर्भाबाबत बोलत आहे. जगाला माहीत आहे की, पाकिस्तान त्याने आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध सीमापार दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर केला आहे, आमच्या संसदेवर, आमच्या आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला आहे, ही यादी पुढे आहे.
हिंसाचाराच्या विरोधात बोलणे हा दांभिकपणा
कुठेही हिंसाचारावर बोलणे हा पाकिस्तानचा सर्वात मोठा ढोंगीपणा आहे. दहशतवाद, अंमली पदार्थ, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी जगात कुप्रसिद्ध असलेला लष्करी देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस करतो. पाकिस्तानने जगात कुठेही हिंसाचाराच्या विरोधात बोलणे हा दांभिकपणा आहे, असेही मंगलानंदन म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community