काॅंग्रेसला धक्का: गांधी घराण्याचे निकटवर्तीय गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा दिला राजीनामा

161

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काॅंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. याआधी गुलाम नबी आझाद यांचा जम्मू – काश्मीर काॅंग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा चर्चेचा विषय बनला होता. हे पद मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

काॅंग्रेस पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या निर्णायांमध्ये त्यांचा सल्ला घेतला जात असे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेकांना धक्काच बसला आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी केलेल्या आंदोलनात आझाद देखील सहभागी होते.

( हेही वाचा: अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.