Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ०६ एप्रिलला तामिळनाडूतील रामेश्वरम (Rameswaram) येथे आशियातील पहिल्या उभ्या लिफ्ट स्पॅन रेल्वे पुलाचे (Vertical lift span railway bridge) उद्घाटन केले. त्याचे नाव पंबन ब्रिज आहे. हा पूल २.०८ किमी लांब आहे. त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये केली. हा आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल म्हणून ओळखला जाणार आहे. (Narendra Modi)
Let’s cheer for our engineers and Team Bharat!👏👏
The iconic #NewPambanBridge inaugurated and #PambanExpress train flagged-off by PM @narendramodi Ji. pic.twitter.com/5ARDOV1fPB
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 6, 2025
पंबन पुलाचे वैशिष्ट्ये
रामायणानुसार राम सेतूचे (Ram Setu) बांधकाम रामेश्वरमजवळील धनुषकोडी येथून सुरू झाले. तसेच हा २.०८ किमी लांबीचा पूल ५५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून बांधण्यात आला आहे. नवीन पांबन पूल हा भारतातील पहिला उभ्या लिफ्ट रेल्वे पूल आहे. ७२.५ मीटर लांबीचा हा पूल १७ मीटरपर्यंत उंच करता येतो, ज्यामुळे मोठी जहाजे खालून जाऊ शकतात. नवीन पूल सध्याच्या पुलापेक्षा ३ मीटर उंच आहे. हा पूल मजबूत स्टेनलेस स्टील, उच्च दर्जाचे संरक्षक रंग आणि पूर्णपणे उच्च दर्जाचे वेल्डिंग जोड्यांपासून बनवला आहे. विशेष म्हणजे या पुलावर पॉलिसिलॉक्सेन कोटिंगमुळे गंजण्यापासून संरक्षण करते.
(हेही वाचा – Karnataka मध्ये भाजपा कार्यकर्त्याने काँग्रेस आमदाराच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या)
नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा कंदील मिळाला
पंतप्रधान मोदी ६ एप्रिल रोजी नवीन पंबन रेल्वे पुलाचे (Pamban Railway Bridge) उद्घाटन केले असून. याशिवाय, ते रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. या काळात, तटरक्षक दलाच्या एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदी दुपारी १:४५ वाजता रामेश्वरममधील प्रसिद्ध रामानाथस्वामी मंदिरात () दर्शन (Ramanathaswamy Temple Darshan) घेतलं यानंतर, दुपारी १.३० वाजता, ते तामिळनाडूमध्ये ८,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि ते राष्ट्राला समर्पित करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community