भारतातून पळून गेलेल्या आणखी एका गँगस्टरची कॅनडातील पिनिपेग शहरात हत्या करण्यात आली आहे. (Khalistan In Canada) पंजाबमधून पलायन करून कॅनडामध्ये गेलेला गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनुके याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपी सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ अर्श दलाचा राईट हँड होता. एनआयएच्या वॉन्टेड यादीतही त्याचा समावेश होता. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला असतांना ही हत्या झाली आहे.
कोण होता सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनेके
सुक्खा कॅनडामधून भारतातील आपल्या गँगच्या गुंडांमार्फत अपहरण आणि खंडणी उकळण्याचे काम करायचा. (Khalistan In Canada) सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनेके याने 2017 मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवून कॅनडाला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याच्यावर ७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांशी संगनमत करून त्याने कॅनडाचा व्हिसा मिळवला होता, या प्रकरणीही दुनेके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब पोलिसांच्या २ कर्मचाऱ्यांवर त्याला मदत केल्याचा आरोप होता, त्यानंतर त्या पोलिसांना मोगा पोलिसांनी अटक केली होती.
यावर्षी मार्चमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगजवळ २ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या. त्याच्या हत्येनंतर खलिस्तानी समर्थकांनी कॅनडा, लंडन आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी निदर्शने केली आणि भारतविरोधी घोषणा दिल्या. निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरले होते.
जस्टिन ट्रुडो यांचे भारतावर आरोप
दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत (हाऊस ऑफ कॉमन्स) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले की, “कॅनडाच्या सुरक्षा संस्था भारत सरकार आणि कॅनडाच्या नागरिकांची चौकशी करत आहेत. हरदीपसिंह निज्जर यांचा हत्येतील सहभागाबद्दल आम्ही सक्रियपणे चौकशी करत आहोत. कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही.” (Khalistan In Canada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community