17व्या शतकातील योद्धे वीर लासित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्रेरणादायी इतिहासाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. भारताचा इतिहास आणि शौर्य आणि पराक्रमाचा असून, स्वातंत्र्यानंतर हा इतिहास जाणीवपूर्वक दाबण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशातील महापुरुष आपल्यासाठी प्रेरणादायी
आसामचे वीर योद्धे लासित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याला वीर लासित यांची 400वी जयंती साजरी करायला मिळत आहे, हे आपले सौभाग्य आहे. वीर लासित यांच्याप्रमाणेच भारतात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत, ज्यांनी केलेले कार्य हे आपल्यासाठी कायमंच प्रेरणादायी आहे.
(हेही वाचाः रेल्वेची मोठी कारवाई, गेल्या 16 महिन्यांत इतक्या अधिकारी व कर्मचा-यांची हकालपट्टी)
इतिहास जाणीवपूर्वक दाबण्यात आला
भारताचा इतिहास हा केवळ गुलामगिरीचा नाही, भारताचा इतिहास हा योद्ध्यांचा आहे,विजयाचा आहे. अत्याचा-यांविरोधात अभूतपूर्व शौर्य आणि पराक्रमाचा भारतीय इतिहास आहे. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही आपल्याला गुलामगिरीचाच इतिहास शिकवला गेला आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला गुलाम बनवणा-या विदेशी अजेंड्याला बदलण्याची गरज होती. पण तसे झाली नाही, देशाच्या कानाकोप-यात असलेल्या वीर आणि वीरांगनांनी अत्याचाराचा सामना करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. पण हा इतिहास जाणीवपूर्वक दाबण्यात आला, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
Join Our WhatsApp Community