India’s Richest MLA: देशातील आमदारांची एकत्रित संपत्ती ७३ हजार कोटी; मुंबईतील ‘हे’ आमदार आहेत सर्वांत श्रीमंत आमदार

165

India’s Richest MLA: देशातील आमदार संपत्तीबाबत प्रचंड मालदार असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. देशातील ४ हजार ९२ आमदारांची एकत्रित संपत्ती ७३,३४३ कोटी रुपये आहे. मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार पराग शहा (Parag Shah) यांच्या नावे ३,३८३ कोटी रुपयांची मालमत्ता असून, ते देशातील सर्वांत श्रीमंत आमदार ठरले आहेत. सर्वाधिक श्रीमंत आमदार (Rich MLA) भाजपामध्ये असल्याचे पाहणीतून समोर आले आहे.  (India’s Richest MLA)

आमदारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेल्या संपत्तीच्या माहितीचे विश्लेषण करून असोसिएशन ऑफ डेमोक्रेडिट रिफॉर्मन (Association of Demo Credit Reform) अहवाल प्रसिद्ध केला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशात शेकडो कोटींची संपत्ती असलेल्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. काँग्रेसच्या डी. के. शिवकुमार यांच्या नावे १,४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. आंध्र प्रदेशच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या नावे देखील शेकडो कोटी रुपयांची संपत्ती आहे. कर्नाटकातील सर्व आमदारांची एकत्रित मालमत्ता १४,१७९ कोटी रुपये आहे. त्रिपुरा येथील आमदारांची एकत्रित मालमत्ता सर्वांत कमी ९० कोटी रुपये आहे.

(हेही वाचा – Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी)

गुन्ह्यातही आमदार पुढे…
देशातील ४ हजार ९१ आमदारांपैरकी १,८६१ आमदारांवर (४५ टक्के) गुन्हे दाखल आहेत. त्यातील १,२०५ आमदारांवर (२९ टक्के) गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यात हिंसक आणि महिला हिंसाचाराच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. आंध्र प्रदेशातील ७९ टक्के आमदारांवर गुन्हे (Crimes against MLAs) दाखल असून, केरळा आणि तेलंगणातील प्रत्येकी ६९ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. टीडीपीच्या ८६ टक्के आमदारांवर गुन्हेगारी कृत्य प्रकरण खटले प्रलंबित आहेत, तर बीजेपीच्या ६३८ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (India’s Richest MLA)

हेही वाचा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.