खलिस्तानवादाबाबत भारत सरकार गांभीर्याने पावले उचलत असून आता कॅनडा सरकारला खुले आव्हान दिले आहे. (India Vs Canada) भारत सरकारने कॅनडाला आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या बिनबुडाच्या आरोपानंतर भारत सरकारने मोठी कारवाई करत कॅनडाला खुले आव्हान दिले आहे आणि कॅनडाने आपल्या डझनभर मुत्सद्दींना परत बोलावण्यास सांगितले आहे. भारत सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 40 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. (India Vs Canada)
(हेही वाचा – Nanded Hospital Tragedy : पुन्हा सात जणांचा मृत्यू)
18 जून रोजी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नुकतेच कॅनडाच्या संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान आरोप केला होता की, भारत सरकारच्या लोकांनी कॅनडाच्या नागरिकाची हत्या घडवून आणली. भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि ते बेतुका आणि प्रेरित असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कॅनडाने हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या दाव्यात अद्याप कोणतेही सार्वजनिक पुरावे दिलेले नाहीत. (India Vs Canada)
कॅनडाविरुद्ध तिसरी कारवाई
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या दाव्यानंतर भारत सरकारची कॅनडावरची ही तिसरी कारवाई आहे. भारत सरकारने सर्वप्रथम कॅनडाच्या गुप्तचर अधिकाऱ्याला देश सोडण्याचा आदेश दिला होता. यानंतर भारत सरकारने कॅनेडियन नागरिकांच्या भारत प्रवेशावर बंदी घालून व्हिसा सेवा बंद केली. यासोबतच भारत सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या आणि तिथे प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी अॅडव्हायजरीही जारी केली होती.
भारत सरकारने कॅनडावर या कारवाईचे संकेत यापूर्वीच दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, भारतात कॅनडाचे अनेक राजनैतिक अधिकारी तैनात आहेत. त्यांची संख्या कमी करणे आवश्यक आहे. भारताच्या या कारवाईवर कॅनडाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (India Vs Canada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community