Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट; नव्या राजकीय वादळाचे संकेत?

98
Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट; नव्या राजकीय वादळाचे संकेत?
Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट; नव्या राजकीय वादळाचे संकेत?

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. नेतेमंडळी प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. प्रचार सभांमध्ये व्होट जिहाद (Vote Jihad) , बटेंगे तो कटेंगे (Batenge to Katenge) हे मुद्दे गाजत आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ट्विटमध्ये म्हटले की, ‘यही समय है, सही समय है। सोए हुओं को जगाने का… उद्या सकाळी 10.30 वा.’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

खडकवासलामधल्या सभेत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. अशातच आता फडणवीसांनी ट्वीट केलं आहे. तर, दुसरीकडे, किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) निवडणूक आयोगाला पत्र लिहून मौलाना सज्जाद नोमानींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

किरीट सोमय्यांनी सज्जाद नोमानींचा एक व्हिडीओ समोर आणला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा, असं आवाहन व्हिडीओद्वारे नोमानी करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओवरुन किरीट सोमय्यांनी मौलाना सज्जाद नोमानींवर (Maulana Sajjad Nomani) व्होट जिहादचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलं आहे. तसेच, या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.