33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Home सत्ताबाजार साडे सहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जीला जामीन

साडे सहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जीला जामीन

107
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवार, २० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ती गेल्या साडे सहा वर्षांपासून तुरुंगात होती. न्या. नागेश्वर राव,  न्या.बी.आर. गवई, ए.एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आणि तिला जामीन दिला. हा निर्णय देताना खटल्याच्या सद्यस्थितीबद्दल न्यायालयाने कोणतीही टिप्पणी केली नाही.

मै खूश हूँ

पीटर मुखर्जींना जामीनाच्या ज्या अटी होत्या त्याच अटी इंद्राणी यांनाही लागू केल्या आहेत. इंद्राणी मुखर्जी यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे एस.व्ही. राजू यांनी बाजू मांडली. मुखर्जीला जामीन दिला तर ती पुराव्यांशी छेडछाड करेल असा दावा वकिलांनी केला मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. काही दिवसांपूर्वी इंद्राणी मुखर्जीने एक खळबळजनक दावा केला होता की शीना जिवंत आहे, तपासयंत्रणांनी तिचा शोध घ्यावा, असे पत्र इंद्राणीने सीबीआयला लिहिले होते. इंद्राणी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी शीना बोरा हत्येप्रकरणी 2015 मध्ये अटक केली होती. सीबीआयने तपास पूर्ण करून या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. इंद्राणीला जामीन मिळाल्यावर तिने माध्यमांशी बोलताना फक्त एक ओळीची प्रतिक्रिया दिली, ‘मै खूश हूँ’, असे इंद्राणी म्हणाली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline