Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

208
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टाटा सन्सचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

(हेही वाचा-निकाल हरियाणाचा, भांडण महाराष्ट्रात! Congress-Shiv Sena UBT मध्ये जुंपणार!!)

रतन टाटा (Ratan Tata Death) यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) मध्यरात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, “आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत, त्यांचं नेतृत्व खरोखर असामान्य होतं. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नाही तर आपल्या राष्ट्राची रचना देखील घडली आहे.”

या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “टाटा समूहासाठी रतन टाटा हे एका अध्यक्षापेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते एक मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी स्वतःच उदाहरण जगासमोर ठेवून इतरांना प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने नेहमी उत्कृष्टता, सचोटी आणि नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्धता दाखवली. समूहाच्या नैतिकतेशी कुठेही तडजोड न करता टाटा समूहाने जागतिक स्तरावर ठसा उमटवला.” (Ratan Tata Death)

(हेही वाचा-हरियाणाच्या विधानसभा निकालानंतर, महायुतीच्या आशा पल्लवित; Ladki Bahin Scheme तारणार!)

रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये IIT बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी ९५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात. (Ratan Tata Death)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.