मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, उदय सामंत यांची माहिती

123

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज, मंगळवारी दुसरा दिवस असून दिवसाची सुरूवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीने झाली होती. अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावेळी लक्षवेधीवर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील सर्व पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.

(हेही वाचा – बीड जिल्ह्यात ‘भाजप’ची सरशी, पंकजा मुंडेंचा दावा; ट्विटकरून कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन)

मुंबईतील गोखले ब्रीजचा प्रश्न अधिवेशनात मांडण्यात आला त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, गोखले पूल हा 7 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागते ही वस्तुस्थिती आहे. या पुलाचे काम रेल्वे, महानगरपालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सूरू करण्यात आले आहे. यासाठी 82 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यापैकी 17 कोटी रेल्वेला देण्यात आले आहेत. या पुलाचे काम तीन टप्प्यात होणार आहे. गोखले पुलाची पहिली मार्गिका मार्च 2023 पर्यंत तर दुसरी मार्गिका डिसेंबर 2023 पर्यंत चालू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. या पुलाचे काम का प्रलंबित होते याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील जनतेची सुरक्षा महत्त्वाची असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागाला सूचना करण्यात येईल. तसेच याबाबत परिवहन व महानगरपालिका तसेच संबंधीत विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. उर्वरित पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून काम पूर्ण केले जाईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री अमित साटम, आशिष शेलार, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतुल भातखळकर, पराग अळवणी यांनी सहभाग घेतला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.