वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लागला आहे म्हणून सर्वसामान्यांना यातून थोडा दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या अबकारी करात कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली. त्यामुळे आता महाराष्ट्राने व्हॅटमध्ये कपात करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या राज्यांनी केली करात कपात
केंद्राने उत्पादन शुल्कात कमी करताच, ओडिशा आणि केरळने देखील पेट्रोल- डिझेलवर आकारण्यात येणा-या व्हॅटमध्ये कपात केली. राजस्थानने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.48 तर डिझेलवर 1.16 रुपयांची कपात केली आहे. ओडिशाने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.23 आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 1.36 रुपयांची कपात केली आहे. तर करेळ सरकारने पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये अनुक्रमे 2.41 आणि 1.36 रुपयांची कपात केली आहे. केंद्राने आतापर्यंत दोनदा कर करातीचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे हे आहेत नवीन दर )
पेट्रोल- डिझेलचे रविवारचे दर
केंद्र सरकारने शनिवारी अबकारी करात कपात केल्यानंतर, पेट्रोल- डिझेल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर रविवारपासून लागू होणार आहेत. रविवार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72रुपये झाला असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 113.35 रुपये असून, डिझेलचा भाव 97.28 रुपये इतका आहे.
Join Our WhatsApp Community