लोकसभेचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षात (BJP) मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. यात अध्यक्षापासून ते सर्व स्तरातील पदाधिकारी बदलले जाण्याची शक्यता आहे. (BJP)
संसदेचे अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष संघटनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी इटलीहून मायदेशी परत येत आहेत. ते जी-७ गटाच्या बैठकीसाठी गेले होते. पंतप्रधान दिल्लीत दाखल झाल्यानंतर भाजपाचा नवीन अध्यक्ष ठरविण्याच्या दिशेने कारवाई सुरु होणार आहे. भाजपाचा अध्यक्ष संघटनेच्या कार्यकारिणीकडून निवडला जातो. यामुळे लवकरच भाजपा नेत्यांची बैठक बोलाविली जाण्याची शक्यता आहे. (BJP)
भाजपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा देशाचे आरोग्य आणि खते व रसायन मंत्री झाले आहेत. शिवाय, त्यांचा कार्यकाळ सुद्धा संपला आहे. यामुळे भाजपाचा (BJP) नवीन अध्यक्ष लवकरच निवडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेनुसार लागलेला नाही. यामुळे पक्ष संघटनेत बदल करणे आवश्यक झाले आहे. अध्यक्ष बदलण्यासोबतच संघटनेत जमिनीशी जुळलेल्या नेत्यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा आहे. (BJP)
(हेही वाचा – PUNE : सुट्टीच्या काळातील विशेष गाड्यांनी रेल्वेला केले ‘मालामाल’; २ महिन्यांत २२ कोटींचा महसूल)
महत्त्वाचे म्हणजे, भाजपाच्या संघटन महासचिव पदी नेहमीच संघांचे पदाधिकारी राहत आलेले आहेत. मात्र, नड्डा यांनी संघाबाबत केलेले विधान आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचे कान टोचल्यानंतर या पदावर कुणाची नेमणूक होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघानुसार भाजपा (BJP) संघटना गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान आणि सरकारच्या अवतीभोवती फिरत आहे. निवडणुकीचा प्रचार सुद्धा केंद्र सरकारच्या योजनावर आधारित होता. मात्र, तिरंगा यात्रा, गंगा बचाव यात्रा यासारखे कार्यक्रम झाले नाही. (BJP)
भाजपाचा (BJP) नवीन अध्यक्ष विद्यमान महासचिव यांच्यातून होणार असल्याची चर्चा आहे. सध्या सात महासचिव आहेत. पण त्यात एकही महिला नाही. आता महिलांना स्थान मिळणार काय? हा प्रश्न आहे. स्मृती इराणी पराभूत झाल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन संघटनेत होणार काय? याकडे लक्ष लागून राहणार आहे. नड्डा यांच्या टीममध्ये ३८ नेते आहेत. पैकी ५ राष्ट्रीय उपाध्यक्ष व ४ राष्ट्रीय सचिव महिला आहेत. महासचिवपदी एकही महिला नाही. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community