Assembly Elections : शरद पवारांच्या अपरिहार्यतेला व्यूहरचनेचे लेबल

140
बारामती विधानसभा न लढवता काकांसमोर Ajit Pawar खेळत आहेत नवी खेळी ?

विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Elections) शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अजितदादांच्या मंत्र्यांविरोधात तगडी व्यूहरचना करून विधानसभा निवडणुकीत शरद पवार २० युवकांना संधी देणार असल्याची सूत्रांनी माहिती दिल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. पण तरुणांच्या गळ्यात तुतारीच्या उमेदवारीची माळ घालण्याखेरीज पवारांकडे दुसरा पर्यायच नाही, याकडे मात्र कोणाचेच लक्ष गेलेले नाही.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात शरद पवार २० तरुण चेहरे मैदानात उतरवतील अशी शक्यता आहे. शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Elections) अजित पवारांच्या आमदारांविरोधात दंड थोपटल्याचं दिसत आहे. बारामती, अणुशक्ती नगर, दिंडोरी, श्रीवर्धन, परळी, कागल ते आंबेगाव अशा २० मतदारसंघात नवीन चेहरे दिसणार आहेत, असे माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले आहे. अहेरी, आष्टी, दिंडोरी, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, बारामती, अमळनेर, उदगीर, इंदापूर, अनुशक्ती नगर, परळी, कागल, आंबेगाव, मावळ, सिन्नर, तुमसर, फलटण, वडगाव शेरी या विधानसभा क्षेत्रांमध्ये आपले उमेदवार तयार करण्यात शरद पवार यांना आतापर्यंत यश आले आहे. या सर्व मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या विरोधात शरद पवार तुतारीच्या उमेदवारीची माळ तरुणांच्या गळ्यात घालणार असल्याचे मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने नमूद केले आहे.

(हेही वाचा – Parliament Session : निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी होणार का? संसदेत चर्चा)

उल्लेख केलेल्या ठिकाणाचे सर्व आमदार अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीच्या सत्तेच्या बाजूने आले आहेत. त्यांना महायुतीतूनच उमेदवारी हवी आहे. त्यामुळे तसेही ते पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार म्हणून उपलब्धच नाहीत. अशा स्थितीत पवारांना या आमदारांच्या विरोधात तरुण उमेदवार शोधावे लागणार नाहीत, तर दुसरे काय करावे लागेल? त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. पण या वस्तूस्थितीकडे दुर्लक्ष करून पवारांच्या अपरिहार्यतेला व्यूहरचनचे लेबल लावण्याचे काम केले जात आहे. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.