-
प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विश्वासार्हतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगानेच संपूर्ण प्रक्रिया निर्दोष असावी यासाठी पावले उचलली आहेत. सध्या तरी, ज्या ठिकाणी त्रुटी आहेत त्या क्षेत्रांची ओळख पटवून दुरूस्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा आयोगाचा विचार दिसतो आहे. याबाबत, आयोगाने (Election Commission) देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (सीईओ) दोन दिवसांची परिषद बोलावली आहे. ४ आणि ५ मार्च रोजी दिल्लीत ही परिषद होणार आहे. पहिल्यांदाच, प्रत्येक राज्यातील एक जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे डीईओ आणि एक निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Mahayuti मध्ये तणाव; भाजपाकडून शिवसेनेला इशारा?)
काही दिवसांपूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी हा पुढाकार घेतला आहे. जरी आयोगाकडून (Election Commission) मतदार यादी तयार करण्यासह निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असली तरी, निवडणुकीदरम्यान किंवा नंतर काही अनियमितता किंवा त्रुटी आढळून येतात. आयोगाच्या मते, या छोट्या चुका नंतर राजकीय पक्षांकडून अतिशयोक्तीपूर्ण केल्या जातात. अशा परिस्थितीत, अशा सर्व चुका किंवा संभाव्य त्रुटींचे क्षेत्र ओळखून त्या दुरुस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परिषदेत आयोग सर्व राज्यांच्या सीईओंसोबत या मुद्यांवर चर्चा करेल.
(हेही वाचा – Pune Crime : पुणे हादरलं! स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरूणीवर बसमध्ये अत्याचार)
अनेक पैलूंवर चर्चा
परिषदेत आयटी क्षेत्राला बळकटी देणे, त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करणे इत्यादी बाबींवर चर्चा केली जाईल. या क्षेत्रात चांगले काम करणारी राज्ये देखील याबाबत आपले सादरीकरण देतील. अलिकडेच हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली आदी राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांत मतदार यादीतील अनियमिततेचे आरोप झाले आहेत. आणि विधानसभा अधिकाऱ्यांच्या खालच्या स्तरावरील समस्या देखील समजून घेतल्या जाणार आहेत. (Election Commission)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community