राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. पत्रकार गोविंद वाकडे असे त्या पत्रकाराचे नाव आहे. शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे. गोविंद वाकडे आणि आरोपींमधील फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅट देखील पोलीसांना सापडले आहे.
पत्रकार संघाचा निषेध
मुंबई मराठी पत्रकार संघाने चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक अयोग्य व निषेधार्ह आहे. पण या शाईफेकीची बातमी टिपणाऱ्या पत्रकाराला अटक करण्याची मागणी त्याहून अधिक निषेधार्ह आहे, असे मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यवाह संदीप चव्हाण यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज गरबडे याने चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथे घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा शाई फेकणाऱ्यावर कलम ३०७ लावण्यामागे चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण…)
Join Our WhatsApp Community