पाकिस्तानातील धर्मांध संघटना म्हणतात, भीक न मागता जगाला अणुबॉम्बची धमकी द्या

145
सध्या पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले आहेत. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. येथील जनता एक वेळच्या जेवणासाठी मारामाऱ्या करत आहे. पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांचा दररोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान जगभरात कर्ज देण्यासाठी भीक मागत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील कट्टरपंथीय संघटनेच्या नेत्याने पाकिस्तान सरकारला अजब सल्ला दिला आहे.

काय म्हणाला अमीर हाफिज साद हुसेन रिझवी?

पाकिस्तानने जगातील विविध देशांसमोर भीकेसाठी हात पसरण्याऐवजी एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घेऊन जगाला धमकावले पाहिजे. असे केल्याने संपूर्ण जग पाकिस्तानच्या मागण्या मान्य करेल, असा सल्ला पाकिस्तानमधील कट्टरपंथी गट तेहरीक-ए-लबाइकचे नेते अमीर हाफिज साद हुसेन रिझवी याने पाकिस्तान सरकारला दिला आहे. रिझवी याने जाहीर भाषणातून हा सल्ला दिला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत रिझवी म्हणाले, अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी लष्कर प्रमुखांना समोर करून पाकिस्तान सरकार जगभरात सगळीकडे भीक मागत आहे. कुणी भीक घालते, तर कुणी भीक देत नाही. काही देश स्वत:चा फायदा बघत आहेत. पण तुम्ही जगाकडे भीक मागण्यासाठी का जात आहात? पाकिस्तान सरकार आणि लष्कराने उजव्या हातात कुराण आणि डाव्या हातात अणुबॉम्बचा बॉक्स घेऊन जगाला धमकावले पाहिजे. त्यानंतर संपूर्ण जग तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.