सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक विचित्र गोष्टी सुरु आहेत. इतक्या आमदारांनी वेगळी चूल मांडली असली तरी ठाकरे मंडळी मात्र मर्सिडीसमधून बाहेर पडायला तयार नाहीत. सध्या जे युद्ध सुरु आहे ते ठाकरे आणि शिवसैनिक असंच आहे. कारण ठाकरेंशी कोण निष्ठावान आहे यावर सध्या चर्चा सुरु आहे. इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई मुळीच नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे कुटुंबवाद आहे.
( हेही वाचा : शौर्य दिनाचे औचित्य साधून भगूरमध्ये वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी)
पूर्वी शिवसैनिकांना शिवबंधन बांधायचे. शिवबंधन म्हणजे असा एक धागा जेणेकरुन सगळे शिवसैनिक हे बंधू बंधू आहेत अशी त्यामागची भावना होती. अनेक शिवसैनिकांनी हे बंधन बांधलेलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी देखील अजूनही शिवबंधन बांधलं आहे असं त्यांनी एबीपी माझावर सांगितलं. आता ४० आमदारांनी उठाव केलेला आहे. ठाण्याचे जवळजवळ सर्वच नगरसेवक शिंदेंना गटात सामील झालेले आहेत. कदाचित धनुष्यबाणावर सुद्धा शिंदे आपला हक्क सांगू शकतात.
या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी शिवसैनिकांची निष्ठा तपासण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेणार असल्याचं म्हटलं आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. असं केल्याने जे ठाकरेंशी निष्ठा राखून आहेत, तेही सोडून जातील. मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवसेना हा पक्ष आहे. कै. बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाला हिंदुत्ववादी असं रुप दिलं होतं. शिवसेनेतल्या जवळजवळ एक-दोन पिढ्या हिंदुत्ववादी म्हणून आकारास आल्या.
आजही या पिढ्या हिंदुत्ववादी आहेत. बदलले ते ठाकरे. ते पवार-गांधींच्या गटात सामील झाले आणि हिंदुत्व मागे राहिले. म्हणून खरं पाहता, शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याऐवजी ठाकरेंनीच प्रतिज्ञापत्र दिलं पाहिजे की आम्ही यापुढे हिंदुद्रोह्यांच्या गटात सामील होणार नाही. आम्ही हिंदुंशी, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत. शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन काय साध्य होणार आहे. हा शिवसैनिकांचा पर्यायाने हिंदुंचाच अपमान ठरेल.
Join Our WhatsApp Community