बेळगावातील शिवरायांच्या अवमानाचा विधान परिषदेत निषेध

143

बेळगावात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत उमटले. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घडल्या प्रकरणाचा निषेध करणारा ठराव मांडला.

बेळगावातील मराठी जनतेच्या पाठिशी! – मंत्री एकनाथ शिंदे

बेळगाव येथील मराठी बहुल जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याची अवमान झाला, त्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. या ठिकाणी कर्नाटक सरकारने बेळगाव येथे विधानभवन उभे केले आहे, अधिवेशन भरवत आहे. त्यामुळे आता तेथील जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. कधी कधी नाक दाबल्यावर तोंड उघडते, त्याप्रमाणे पद्धत अवलंबावी लागेल. घडलेल्या घटनेचा आपण धिक्कार करतो आणि निषेधाचा ठराव मांडतो.

(हेही वाचा भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची विधानसभेत नक्कल! सभागृहात गदारोळ)

काय म्हटले जयंत पाटील?

बेळगाव सीमाभागाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने तेथील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यस सांगितले आहे. तरीही त्या ठिकाणी बेळगाव शहर आणि गावात चुकीचे प्रकार घडत आहेत.  हे चुकीचे आहे, असे शेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले.

काय म्हणाले दिवाकर रावते?

हा विषय गंभीर आहे. यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. या सभागृहाच्या तीव्र भावना सर्वौच्च न्यायालयात पोहचल्या पाहिजेत. कर्नाटकात बेळगावला विधानभवन बांधण्यात आले, तिथे अधिवेशन घेतले जात आहे, हे चुकीचे आहे, असे शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते म्हणाले.

विरोधकांचा पाठिंबा

यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, बेंगळुरू येथे शिवरायांची विटंबना केली. त्यांचा निषेध करणारा ठराव मंत्री एकनाथ खडसे यांनी मांडला, त्याचे समर्थन विरोधक करताता. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श आहेत. सीमा भागात आंदोलन आम्हीही पाहिले आहे. याविषयावर भाजपने स्पष्ट भूमिका घेतली आहे. महाराजांचा अवमान होणारी घटना दुर्दैवी आहे, मंत्र्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. महाराजांचा अवमान करणारे लोक कोण आहेत, ते कुठल्या पक्षाचे आहेत आहेत, याची स्पष्टता झाली असती तर बरे झाले असते, असेही दरेकर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.