सध्या भाजपप्रणित NDA चा विरोध करण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी I.N.D.I.A नावाने नवीन आघाडी उभी केली आहे, ज्याचे प्रमुख नेतृत्व काँग्रेस करत आहे. मात्र या आघाडीतील छोटे-मोठे राजकीय पक्ष आता भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना विरोध करताना वैचारिक पातळी घसरवत आहेत, असे दिसून येत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना या I.N.D.I.A आघाडीवाल्यांचे ताळतंत्र सुटले आहे, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण याच आघाडीतील एका छोट्या पक्षाच्या नेत्याने चक्क भारत मातेचा अवमान केला आहे.
भारतमातेचा अवमान करणारे चित्र सोशल मीडियात पोस्ट केले आहे, ज्याचा भाजपचे नेते, राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही या पोस्टचा चांगलाच समाचार घेणे सुरु केले आहे. या पोस्टमध्ये श्रीरामाच्या रूपात पंतप्रधान मोदी आणि लक्ष्मणाच्या रूपात अमित शहा यांना दाखवले आहे, तर त्या दोघांच्या मध्ये एक नग्न स्त्री दाखवली आहे, तिच्या गुप्तांगावर भारताचा झेंडा दाखवला आहे. या पोस्टरला ‘मणिपूर’ असे नाव देण्यात आले आहे.
(हेही वाचा ATS : पुण्यात दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली चिठ्ठी; बॉम्ब बनवण्याची होती माहिती)
काय आहे त्या पोस्टमध्ये?
या चित्राच्या माध्यमातून भारताच्या झेंड्याचा वापर करून भारताचा अवमान करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. गौरव भाटिया यांनी त्यांच्या पोस्टखाली म्हटले आहे की, अत्यंत दुःखदायक पोस्ट. कायदेशीर लढाई सुरू होईल. ही धर्मनिरपेक्षता आहे का? फक्त आपण सहिष्णु आहोत म्हणून आपल्या धार्मिक भावनांना क्रूरपणे चिरडण्याचा अधिकार I.N.D.I.A कुणी दिला? आमच्या पूज्य देवांचा अनादर करणारे अपमानास्पद पोस्टर लावणारा माणूस एमएच जवाहिरुल्ला आहे, एमएमकेचा पक्षाध्यक्ष, राष्ट्रीय विरोधी ब्रिगेडचा सहयोगी आहे. भारत जोडो यात्रेत तो राहुल गांधींसोबत फिरला होता’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Join Our WhatsApp CommunitySo deeply hurt. Will give it back to them hard so hard. Legal war will be initiated
Is this secularism?
Just because we are tolerant doesn’t give I.N.D.I.A the right to brutally crush our religious sentiments. It’s stated that the man who put derogatory posters disrespecting our… pic.twitter.com/kWKIeo0m6p— Gaurav Bhatia गौरव भाटिया 🇮🇳 (@gauravbh) July 30, 2023