Sharad Pawar यांच्या उपस्थितीत महारावांकडून श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान; गुरुवारी राज्यभर आंदोलन

403
तथाकथित पुरोगामी पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात बोलताना प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. विशेष म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते. या दोघांनीही मूकसंमती देत तेव्हा कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी हिंदुत्ववादी संघटना राज्यभर शरद पवारांच्या विरोधात निषेध आंदोलन करणार आहेत.

महाराष्ट्राची क्षमा मागावी

याविषयाची माहिती भाजपाच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी X वर पोस्ट करून दिली. या घडल्याप्रकरणी ज्ञानेश महाराव यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावीच, पण त्यांच्या या वक्तव्याला मूकसंमती दिल्याबद्दल शरद पवारांनीही माफी मागावी अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. आचार्य; तुषार भोसले यांनी केलेल्या पोस्टमध्ये ‘रामभक्त, स्वामीभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव याने प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. प्रभू श्रीराम आणि हिंदू धर्माच्या आराध्य दैवतांचा वारंवार अपमान करणाऱ्यांचे मुख्य सूत्रधार ‘मौलाना शरद पवार’ यांचा निषेध करण्यासाठी हिंदु समाजातर्फे उद्या राज्यभर आंदोलन होणार आहे. सर्व रामभक्त, स्वामीभक्त आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आध्यात्मिक समन्वय आघाडी आवाहन करते आहे, असेही आचार्य तुषार भोसले यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.