स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध नाही. वीर सावरकरांचा अपमान करणे त्यांना माफीवीर योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीत मांडली आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.
( हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॉंग्रेसच्या शिदोरी मासिकावर कारवाई करावी – रणजित सावरकर)
ठाकरे गट नाराज, विरोधकांच्या बैठकीकडे पाठ
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्याकरिता दिल्ली येथे विरोधी पक्षांची सोमवारी रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वतः सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी तसेच शरद पवार यांसोबत अन्य समाजवादी, जेडीयु खासदार उपस्थित होते. परंतु, राहुल गांधींनी वीर सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे उद्धव ठाकरे गट नाराज असून त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती.
उद्धव ठाकरेंच्या याच नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत मांडला. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. तसेच सावरकर आणि संघ यांचा संबंध नाही. आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असून आपण त्यावर चर्चा करायला हवी. अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी आपण शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असे बैठकीत सांगितले.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना, उद्धव ठाकरे व शरद पवारांनी राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडलं पाहिजे तेव्हाच ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेला अर्थ प्राप्त होईल, असेही रणजित सावरकरांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community