गेल्या काही दिवसांपासून भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा या चांगल्याच चर्चेत आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मु्लाखतीत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशात दंगल देखील उसळली होती. पण यानंतर आता शर्मा यांच्यावर भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुपूर शर्मा यांच्यासह दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांना भाजपकडून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे शर्मा यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे.
सर्व जबाबदा-यांमधून केलं मुक्त
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे नुपूर शर्मा यांना भाजपने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं असून, त्यांना सर्व जबाबदा-यांतून मुक्त करण्यात आले आहे. कोणत्याही धर्माच्या धर्मगुरुंचा भाजप कधीही अनादर करत नाही. कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारा विचार आम्हाला अजिबात मान्य नाही, असे भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘आपका मुसेवाला होगा’, सलमान खानला वडिलांसह जीवे मारण्याची आली धमकी)
भाजपची ठाम भूमिका
भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माची भरभराट झाली आहे. त्यामुळे भाजप कोणत्याही धर्माचा किंवा धर्मातील व्यक्तीचा अपमान करत नाही. आणि असे करणा-या विचारधारेच्या विरोधात पक्ष ठाम आहे. अशा विचारधारेचा भाजप कधीही प्रचार करू इच्छित नाही, असे अरुण सिंह यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community