मागच्या अडीच वर्षांत आमदारांना अपमानास्पद वागणूक; बंडखोर आमदाराचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

133

महाराष्ट्राच्या राजकारणात जो सत्ता नाट्याचा थरार सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना एक खरमरीत पत्र लिहून, आमदारांना मागच्या अडीच वर्षांत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा दावा केला आहे. अडीच वर्षे आमच्यासाठी वर्षाची दारे बंद होती. अनेकदा तासनतास आम्हाला वर्षाच्या गेटवर वाट बघायला लागली. असा आरोप शिरसाट यांनी पत्राद्वारे केला आहे.

शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांनी हे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपले मत मांडल्यानंतर, शिरसाट यांनी हे पत्र लिहिले आहे.

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

  • काल वर्षा बंगल्याची दारे ख-या अर्थाने सर्वांसाठी खुली झाली.
  • सेना आमदार म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून दारे बंद होती
  • यापूर्वी दार उघडण्यासाठी बडव्यांची मनधरणी करावी लागत होती.
  • हेच चाणाक्य कारकून राज्यसभा, विधान परिषदेची रणनीती ठरवत होते.
  • स्वपक्षीय आमदार म्हणून आम्हाला कधीच वर्षा बंगल्यावर प्रवेश मिळाला नाही.

( हेही वाचा: शिवसेनेची मुलुखमैदानी तोफही एकनाथ शिंदेच्या साथीला )

आम्हाला अयोध्येत का जाऊ दिले नाही

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमातळावरुन निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहका-यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करुन सांगितले की, आमादारांना अयोध्येत जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर अविश्वास का दाखवलात? असा प्रश्न शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.