मतदारसंघातील सर्व पक्षीय सरपंचांना विमा कवच! नितेश राणेंची घोषणा

येत्या चार दिवसांत सर्व सरपंचांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. संबंधित विमा कंपनीशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालये आहेत. अजून काही रुग्णालये जोडली जाणार आहेत, अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.

राजकरणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कुणी मित्र नसतो…मात्र तरी देखील काही राजकारणी फक्त आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचा विचार करत असतात. पण आमदार नितेश राणे यांनी राजकारणापलीकडे माणुसकी जपत राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंचांना आमदार नितेश राणे यांनी आधार दिला आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी आधार देताना कुठलाही भेदभाव केलेला नाही.

सर्व पक्षीय सरपंचांना असा देणार मदतीचा हात!

नितेश राणे यांच्याकडून मतदारसंघातील सरपंचांना प्रत्येकी ३ लाखांचा आरोग्य विमा आणि ७ लाख ५० हजारापर्यंतचा मोबदला मिळेल, असे विमा कवच दिले जाणार आहे. राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या सरपंचांचा ३ लाखांचा खर्च झाला असेल त्यांना आणखी ७५ हजार रुपये वाढवून मिळणार आहेत. तसेच रुग्णवाहिकेपासून व्हीआयपी उपचार पद्धती यात लागू होणार आहे. कोरोनाबरोबरच इतर आजारही या विमा कवचमध्ये समाविष्ट केले आहेत.

(हेही वाचा : आदर्श भाडेकरार कायदाः काय आहेत नव्या तरतुदी? कोणाला किती मिळणार फायदा?)

काय म्हणाले नितेश राणे?

येत्या चार दिवसांत सर्व सरपंचाचे विमा उतरण्याची प्रक्रिया देशातील चोला मंडलम या प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनीकडून पूर्ण केली जाईल. ज्या मतदारांनी मला निवडून दिले आहे त्या सर्वांचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. या विमा कंपनीशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालये आहेत. अजून काही रुग्णालये जोडली जाणार आहेत. कोरोनामुक्त गावाबरोबरच तो भयमुक्त करणे गरजेचे आहे. सर्वच सरपंच या फ्रंटलाईनवर काम करतात, त्यांना संरक्षण देणे गरजेचे होते. त्यामुळे माझ्या मतदार संघातील सरपंचांपासून सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्हा हा राणे कुटुंबियांवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली की संपूर्ण जिल्ह्यासाठीही निश्चितच विचार करू, असे नितेश राणे म्हणालेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here