केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी केंद्र सरकारने आयकर स्लॅबमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मला सीतारामन (Interim Budget 2024) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांचे सरकार वंदे भारत ट्रेनच्या बोगीप्रमाणे ४० हजार रेल्वे बोगी बनवेल. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात इतर अनेक मोठ्या योजनांचा उल्लेख केला आहे.
(हेही वाचा – Interim Budget 2024 : भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प)
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या ६० वर्षांत जे निर्णय झाले नाहीत, ते गेल्या १० वर्षांत झाले. गरीब, शेतकरी, महिला व तरुण या चार प्रमुख घटकांना त्यांनी न्याय दिला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आजच्या अर्थसंकल्पात महिला व मुलींना प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधान (Interim Budget 2024) आवास योजनेत २ कोटी घरं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे रोटी, कपडा, मकान देणारा हा अर्थसंकल्प व हे केंद्र सरकार आहे.”
(हेही वाचा – Gyanvapi : न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक हिंदूंनी ज्ञानवापीची ओळख बदलली; थेट ‘ज्ञानवापी मंदिर’ असाच लावला फलक )
पत्रकारांशी संवाद..
01-02-2024 📍मुंबई https://t.co/4zpxssXb0p
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2024
अर्थसंकल्प मांडतांना अर्थमंत्र्यांनी केलेल्या काही आकर्षक घोषणा –
१. देशाच्या भांडवली खर्चासाठी नवीन आर्थिक वर्षासाठी ११.१ लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ११.१ टक्क्यांची
वाढ झाली आहे.
२. नवीन टेक-सॅव्ही उद्योजकतेनं भारलेल्या तरुणांसाठी नवीन अर्थसहाय्य योजना. त्यासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद. या निधीतून तरुणांना कमी
व्याजदराने किंवा काही वेळा व्याजरहित कर्ज उपलब्ध करून देणार.
३. आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेचा फायदा आता अंगणवाडी आणि आशासेविकांनाही मिळणार.
४. गरोदर माता आणि नवजात अर्भकासाठी असलेल्या कल्याण योजनेला अधिक सर्वसमावेशक करणार. त्यासाठी नवीन योजना आणणार.
५. ‘लखपती दीदी’ योजनेचं उद्दिष्टं २ कोटी रुपयांवरून ३ कोटी रुपयांवर आणलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community