राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. निवडणूकपूर्व या अर्थसंकल्पात काय नव्या घोषणा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात 8 हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यावर 27 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात चर्चा होणार आहे, त्यानंतर दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
(हेही वाचा Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण हिंसक होत आहे, तर सरकार काय करत आहे? उच्च न्यायालयाने फटकारले)
अर्थमंत्री अजित पवार हे पुढील चार महिन्यांचा अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. राज्यातील विकास कामांसाठी पुढील चार महिन्यात लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांचे भत्ते, राज्याच्या असलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज, आगामी निवडणुकांसाठी लागणारा खर्च याचा समावेश असेल.
कोणत्या घोषणा होऊ शकतात?
राज्यातील पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
त्याचबरोबर रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत.
u