उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन 

79

राजस्थानातील कन्हैयालाल या टेलरची हत्या केल्यानंतर अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे याची हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी पोस्ट टाकल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. आता या प्रकरणाच्या चौकशीनंतर या हत्येचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे.

या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफिक अहमद अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. मौलवी अहमद यानेच कोल्हे यांच्या हत्येचा प्लान आखला होता. त्याला यासाठी कतार आणि कुवैतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी इरफान शेख, शोएब खान, मुदस्सिर अहमद, आतिफ राशिद, यूसुफ खान, अब्दुल तौफीक आणि शाहरुख पठान वांछित आरोपी शमीम अहमद, फिरोज अहमद यांच्यासोबत काम करीत होते. आतापर्यंतया प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्यामुळे भाजपमध्ये होती नाराजी; केसरकरांचा दावा)

काय आहे प्रकरण? 

21 जून रोजी कोल्हे (54) यांची हत्या करण्यात आली होती. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिण्याविरोधात त्यांची हत्या करण्यात आली. NIA ने आपल्या प्राथमिक तपासात दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या एका समुहाने शर्मा यांना समर्थन करणाऱ्यांना मेसेज पाठवण्याचे कारस्थान रचले होते. त्यांनी धर्मांच्या आधारावर शत्रूत्व वाढवण्यासाठी भारतात एका समुहात दहशत निर्माण करण्याचा कट रचला होता. समाजातील एका समुहात दहशत निर्माण करण्यासाठी ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.