राज ठाकरेंना हिंदुत्वाकडून भाषिक मुद्दयाकडे वळवण्याचा डाव

138
स्थानिक भूमिपूत्र आणि भाषिक मुद्यावरून राजकारणात एन्ट्री मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता राजकारणातील आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर प्रादेषिक मुद्यावरून हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातला. परंतु आता उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्याआडून पुन्हा त्यांना परप्रांतियांच्या विरोधात बोलायला लावून त्यांना हिंदुत्वाकडून प्रादेषिक मुद्याकडे वळवण्याचा सापळा रचला जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

मनसेला फारसे यश मिळाले नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या मुद्दयावरून राजकारणाला सुरुवात केली. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतूनच असाव्यात यासाठी आंदोलन करतानाच मनसेचे वाहन चालकांकडून आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधातही आंदोलन पुकारले. याची दखल घेत सरकारला टोल नाके बंद करावे लागले. रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतियांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याबाबत मनसेने पुकारलेल्या आंदोलनानंतर त्यांच्याकडे प्रादेषिक पक्ष म्हणून बघण्यात येत होते. स्थानिक भूमिपूत्र आणि भाषिक मुद्यावरून राजकारण करणाऱ्या मनसेला सन २०१४ आणि सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत आणि २०१७च्या महापालिका निवडणुकीत यश मिळाले नाही. भाषिक मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या मनसेसोबत काँग्रेस तसेच भाजप यांनी युती करण्यास स्वारस्य दाखवले होते.

…म्हणून मनसेकडून ब्रुजभूषण यांना उत्तर दिले नाही

त्यामुळे आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि संघटनांत्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत, अल्टीमेटम दिला आणि लाऊडस्पिकर मशिदींवरून न हटल्यास हनुमान चालिसा  ऐकवण्याचा इशारा दिला. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अनेक मशिदींनी स्वत:हून भोंगे खाली उतरवले. राज ठाकरे यांनी भोंग्यावरील कारवाईसाठी आक्रमक भूमिका आणि अयोध्येत जाण्याचे जाहीर करत मनसेची वाटचाल खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्यादिशेने होत असल्याने, अनेक विरोधी पक्षांमध्ये पोटशूळ उठला आहे. त्यामुळे त्यांच्या अयोध्या दौऱ्यातच आडकाठी घालण्याचा प्रयत्न सुरु झाला असून, उत्तर प्रदेशात त्यांना येण्यास मज्जाव करणारेच ब्रुजभूषण हेच आता त्यांना थेट आव्हान देत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उकरुन काढण्याचा प्रयत्न होत असून, राज ठाकरे यांनी परप्रातियांच्या विरोधात बोलावे अशीच इच्छा राजकीय पक्षांची आहे. अशाप्रकारे राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुदद्याकडून प्रादेषिक मुदद्याकडे वळवण्यात यशस्वी होणार असल्याने, मनसे ब्रुजभूषण सिंह यांच्या आव्हानांतरही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देताना दिसत नाही.
राज ठाकरे यांच्या विरोधात बोलूनही पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने, ब्रुजभूषण यांनी मुंबईत सभा घेण्याचे आव्हान दिले. परंतु राज ठाकरे यांनी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे यावर उत्तर देणे टाळत इतर विरोधी राजकीय पक्षांचे मनसुबे पूर्ण होऊ नये याची काळजी घेतली आहे. राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून भविष्यात भाजपसोबत युती होण्याची दाट शक्यता असल्याने, विरोधी पक्षांच्या पोटात शूळ उठला आहे. त्यामुळे मनसेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून परावृत्त करून पुन्हा भाषिक मुद्दयावर आणल्यास भाजपसोबतची युती होण्याची  तसचे भविष्यात ते एकत्र येण्याची शक्यता असल्याने उत्तर प्रदेशमधील खासदाराला पुढे करून मनसे विरोधात आवाज उठवला जात आहे. ब्रुजभूषण यांचा बोलवता धनी कोण हे मनसेच्या प्रवक्त्यांनी सोशल मिडियावर जुने फोटो व्हायरल करत जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे  हिंदुत्वाच्या मुदद्यावरून लक्ष विचलित करून, त्यांना परप्रांतियांच्या विरोधात उभे करण्याचा एकप्रकारे सापळाच रचला जात असून, या सापळ्यात राज ठाकरे आणि मनसैनिक अडकतात का याकडेच सर्वांचे लक्ष आहे. परंतु मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे आतापर्यंत विरोधकांचा छुपा डाव अद्यापही यशस्वी होताना दिसत नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.