श्याम मानव यांची चौकशी करा; मंत्री Sudhir Mungantiwar यांची मागणी

128

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांची पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करा, अशी मागणी भाजपा नेते, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शुक्रवारी, २६ जुलै रोजी पत्रकारांशी बोलतांना केली. श्याम मानव यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. पण उगाच आरोप करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे. श्याम मानव यांची नार्को टेस्ट तरी करावी, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

श्याम मानव यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ED च्या कारवाईपासून वाचण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढे एक ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरनुसार उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे व अनिल परब यांना तुरुंगात डांबण्यात येणार होते. पण देशमुखांनी असे करण्यास ठाम नकार दिला. त्यांनी त्यासंबंधीच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यामुळे हे नेते वाचले, पण देशमुखांवरच तब्बल 13 महिने तुरुंगात जाण्याची वेळ आली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. आता मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या आरोपाच्या प्रकरणी श्याम मानव यांची चौकशी कारण्याची मागणी केली.

(हेही वाचा Khalistani Pannu: भारतात परत जा; दहशतवादी पन्नूची कॅनडातील हिंदू खासदाराला धमकी)

लाडकी बहीण योजनेवर अर्थखात्याचा आक्षेप

भाजपा 5 वर्षे जनतेचे संकल्प घेऊन काम करणारा पक्ष आहे. महाराष्ट्राची शक्ती वाढावी, स्थिरता राहावी ही भाजपाची भूमिका राहिली आहे. विभागवार आढावा बैठका घेण्यामागे आम्ही सर्वांनी मिळून काम करावे ही भावना आहे. पक्षाच्या नेत्यांशी, आमदार, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याने मते कळतात, असे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतले आहेत. अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. कुठलीही फाईल वित्त विभागाकडून येते. 17-18 लाख कर्मचाऱ्यांना वेतनाचा भार येत नाही. मग दोन – अडीच कोटी महिलांना लाभ देतानाच अडचण येण्याचे कारण नाही, असे मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या प्रकरणी अर्थ खात्याला ठणकावले.

तेव्हा का गप्प होते?

गरीब महिलेच्या खरेदीतून बाजाराला फायदा होणार आहे. या महिला काही मोठ्या साईटवरून खरेदी करीत नाही. गरीब महिलांविषयी दुष्ट इच्छा असलेले लोकच असे बोलू शकतात. सोळा-सतरा लाख लोकांसाठी 44 हजार कोटी दिले तेव्हा कोणाच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला, असे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले. कृषी सबसिडी देण्याऐवजी महत्त्वाचा भाग हा वीजपंप आहे. 14 हजार 700 कोटी शेतकऱ्यांना देतो. तेव्हा उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. कोळसा रॅकेट संदर्भात महाविकास आघाडी सरकारमध्येही चौकशी झाली. चौकशी करण्याचा अधिकार महावितरणला आहे, असे ते म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.