आर्यनसह समीर खान प्रकरणातून वानखेडेंना हटवले! कोण करणार तपास? 

चौकशी निष्पक्षपणे करण्यात यावी, म्हणून वानखेडेंना या प्रकरणांपासून दूर करण्यात आल्याचे एसीबीने म्हटले.

क्रूझ ड्रुग्स पार्टी प्रकरणात किंग खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यावर राजकीय पातळीवर ‘टार्गेट’ बनलेले एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरण काढून घेण्यात आले. तसेच मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याही प्रकरणातून वानखेडे यांना दूर करण्यात आले आहे.

काय म्हटले एनसीबीने?

दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर एनसीबीने स्वतः याचा खुलासा केला आहे. आर्यन खान आणि समीर खान यांच्यासह ६ प्रकरणांमध्ये वानखेडे यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यांची चौकशी करत आहे. ही चौकशी निष्पक्षपणे करण्यात यावी, म्हणून समीर वानखेडे यांना या प्रकरणांपासून दूर करण्यात आले आहे, असे सांगितले.

संजय सिंग करणार तपास

दरम्यान आता या प्रकरणांचा तपास संजय सिंग करणार आहेत. सिंग हे थेट दिल्लीतून मुंबईत येणार आहेत. शनिवारपासूनच सिंग हे या प्रकरणांच्या तपासाची सूत्रे हाती घेणार आहेत.

(हेही वाचा : गृहमंत्र्यांच्या मतदार संघातच बैलगाडा शर्यत! कायद्याची ऐशी तैशी)

मी स्वतःच बाजूला झालो! – वानखेडे

दरम्यान या निर्णयावर बोलताना एनसीबीप्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः खुलासा केला. ते म्हणाले की, या प्रकरणांच्या तपासातून आपल्याला हटवण्यात आले नाही, तर आपण स्वतःच तशी मागणी याचिकेद्वारे न्यायालयात केली होती.

काय म्हणतात नवाब मलिक!

या सर्व प्रकरणात नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले कि, ही तर सुरुवात आहे, अशी एकूण २६ प्रकरणे आहेत.

तसेच हा निर्णय वानखेडेंच्या म्हणण्यानुसार झाल्याचा त्यांचा दावा खोटा आहे. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका करून त्यांच्यावरील आरोपांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती, असे मलिक म्हणाले.

आपण स्वतः या प्रकरणी विशेष तपास पथकांची स्थापना करण्याची मागणी केली होती, त्याप्रमाणे केंद्र आणि राज्य यांची २ विशेष पथके स्थापन झाली आहेत, असेही मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here