प्रश्न पाठवा, उत्तरे देईन… रश्मी शुक्ला यांचा चौकशीसाठी हजर राहण्यास नकार! ‘हे’ आहे कारण

74

अवैधरित्या फोन टॅप केल्याप्रकरणी राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण रश्मी शुक्ला या चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचे, त्यांनी सांगितले आहे. चौकशीची घाई असल्यास ई-मेलद्वारे प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देण्यात येतील असे त्यांनी सायबर सेलला सांगितल्याचे कळते.

चौकशीसाठी पाठवले होते समन्स

2019 मध्ये रश्मी शुक्ला यांनी एसआयडीएमध्ये असताना, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासाठी सायबर सेलकडून त्यांची चौकशी करण्यात येणार असून, 28 एप्रिल रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पण कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या मुंबईला चौकशीसाठी हजर राहणे शक्य नसल्याचे रश्मी शुक्ला यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार? सरकारची तयारी सुरू!)

हजर न राहण्यामागे हे आहे कारण

महाराष्ट्र केडरच्या 1988च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैद्राबाद येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलात महासंचालक पदावर त्या कार्यरत आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने, आपल्याला पोलिस व्यवस्थेवर लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे आपण चौकशीला येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. चौकशीची घाई असेल तर प्रश्न पाठवून दिल्यास आपण ई-मेलद्वारे त्याची उत्तरं देऊ शकतो, असे त्यांनी सायबर सेलला सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.