बांगलादेशात मुस्लिमांसाठी पवित्र कुराण श्री हनुमानाच्या चरणी ठेवल्याने हिंदू-मुस्लिम दंगल झाली. या जातीय हिंसाचारात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले. हिंदूंचे घरे जाळण्यात आली. यानंतर धक्कादायक सत्य बाहेर पडले आहे. हनुमानाच्या पायाशी कुराण ठेवणारा कुणी हिंदू नसून खुद्द मुसलमानच होता, असे समोर आले आहे.
इक्बाल हुसेनने रचले कारस्थान!
हनुमानाच्या मूर्तीच्या पायाशी इक्बाल हुसेन नावाच्या ३४ वर्षीय मुसलमान तरुणाने कुराण ठेवले. सुजनगर येथे राहणाऱ्या तरुणाच्या वडिलांचे नाव महंमद आलम आहे. त्याने कुराण हनुमानाच्या चरणी ठेवल्यावर हा हिंदूंनी मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्याची चर्चा सुरु झाली आणि देशात हिंदूंविरोधात असंतोष पसरला. हिंदूंवर हल्ले झाली. अजून इकबाल हा फरार आहे.
(हेही वाचा : तलाक दिला तरी पोटगी द्यावीच लागेल! उच्च न्यायालयाचा आदेश)
३३ जिल्ह्यांमध्ये झाली दंगल!
या घटनेनंतर १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशातील ३३ जिल्ह्यांतील ३३५ मंदिरांवर हल्ले झाले. यामध्ये मंदिरांतील किंमती वस्तू चोरण्यात आल्या. मूर्तींची तोडफोड करण्यात आली. सुमारे १८०० हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली.
सोशल मीडियात चर्चेला उधाण
So many Hindus died in Bangladesh because Iqbal Hossain kept the Quran at a puja mandap and blamed the Hindu community for it. That’s the tweet.
— Rashmi Samant (@RashmiDVS) October 20, 2021
Join Our WhatsApp Communityबांग्लादेश में हनुमान जी के चरणों में कुरान रखकर दंगे भड़काने वाले इकबाल हुसैन का #CCTV #Video pic.twitter.com/hjK1X2TASj
— Gunjan@Chouby (@GunjanChouby1) October 20, 2021