आयुक्तांचा झाला भुलभुलैय्या : बदल्या करा आणि मग रद्द करा यातच चहलांचा वेळ खर्ची

189

मुंबई महापालिकेचे एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनवणे आणि उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांच्या केलेल्या बदल्या रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पुन्हा एकदा केलेल्या सहआयुक्त व उपायुक्तांच्या बदल्या रद्द कराव्या लागल्या आहेत. परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त(विशेष) या पदावर करण्यात आली होती, तर या पदावरील संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्त पदी करण्यात आली आहे. परंतु आता या दोघांकडे पुन्हा एकदा मूळ पदाचाच भार सोपवण्यात आला असून उपायुक्त (विशेष) कडे असलेल्या निवडणूक, नियोजन, जिल्हा नियोजन समिती आदींचे काम आता परिमंडळ चार कडे अर्थात सहआयुक्त विजय बालमवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

पुन्हा दोन्ही अधिकाऱ्यांची मूळ पदी नियुक्ती

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त असलेले बालमवार यांची मागील दीड वर्षांत अनेक बदल्या झाल्या आहेत. कोविड काळात मुलुंड ते घाटकोपर या परिमंडळ सहामध्ये उपायुक्त म्हणून पदभार सांभाळणाऱ्या बालमावार यांच बदली पुढे परिमंडळ ४, आणि त्यानंतर परिमंडळ २, त्यानंतर परिमंडळ १ आणि पुन्हा परिमंडळ ४मध्ये बदली झाली होती. या परिमंडळ चारमधून त्यांची बदली उपायुक्त (विशेष) या पदी करण्यात आली होती आणि परिमंडळ चारच्या उपायुक्त पदी उपायुक्त (विशेष)पदी असलेल्या संजोग कबरे यांची बदली १ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. परंतु अवघ्या सातच दिवसांमध्ये या बदली रद्द करून पुन्हा दोन्ही अधिकाऱ्यांची मूळ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

( हेही वाचा : …तर महापालिकेच्या २२०० पदविकाधारक अभियंत्यांवर होईल दुष्परिणाम!)

परंतु बालमवार यांच्याकडे पुन्हा परिमंडळ चारच्या उपायुक्तपदाचा भार सोपवताना त्यांच्याकडे यापूर्वी दिलेल्या मागासवर्ग कक्ष) व महानगरपालिका परिक्षेत्रातील महानगरपालिका संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष) व परिक्षेत्रातील पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर”,पतपुरवता सुविधेची अंमलबजावणी, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर (PM SVANIDHI) विशेष सूक्ष्म (PM SVANIDHI) विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधेची अंमलबजावणी करण्याकरिता “समन्वय अधिकारी” करण्याकरिता “समन्वय अधिकारी” या पदांचा भार कायम ठेवण्यात आला आहे. उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) यांच्याकडे असलेले १) नियोजन खात्याचे कामकाज, २) महिला व बालकल्याण आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व ३) नियोजन, जिल्हा नियोजन व जिल्हा नियंत्रण आणि विकास परिषद (डी.पी.डी.सी.)चा पदभार आणि निवडणूक विभागाचा पदभारही बालमवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.