अजित पवार यांना अद्याप क्लीन चिट नाही
सिंचन घोटाळा हा अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे. असे असताना देखील गेल्या नऊ – दहा वर्षांपूर्वी सिंचन घोटळा उघडकीस आला असून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ कारवाई होते असा नाटक करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात जे गुन्हेगार आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. चितळे समितीने याबाबतीत सर्व अहवाल सादर केला आहे. नागपूर खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली, मात्र खंडपीठाने ती अद्यापही मान्य केली नाही. भ्रष्टाचाराचे प्रकरण रेंगाळणे हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही, असे देखील पांढरे या वेळी म्हणाले. अजित पवारांना 2019 साली सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा शिवसेना हिंदू सण साजरे करायला विसरली होती, शेलारांची टीका)
Join Our WhatsApp Community