Irshalgad Landslide : इर्शाळवाडी येथील दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करणार – छगन भुजबळ

जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार

230
Irshalgad Landslide : इर्शाळवाडी येथील दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करणार - छगन भुजबळ

रायगडच्या इर्शाळवाडी (Irshalgad Landslide) येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या (Irshalgad Landslide) पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे.

(हेही वाचा – Irshalgad Landslide : मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर; आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू)

जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर (Irshalgad Landslide) येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.

रायगडातील इर्शाळवाडीवर (Irshalgad Landslide) ही अत्यंत दुर्गम भागातील वस्ती आहे. त्यामुळे तेथील बचावकार्यात अडचण येत आहे. या वाडीत एकूण ४० ते ४५ घरं होती. त्यातील १४ ते १५ घरं या दरडीखाली अडकले आहेत. आतापर्यंत ९८ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेतील सर्व जखमींचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.