“मदरसा शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे? तालिबान (Taliban) जे काही मोठं झालं, ते मोठं करणारे या मदरशांमध्ये (Madrasa Nitesh Rane) तर जन्माला येत नाहीत ना? हा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे. या मदरसाच्या निमित्ताने मी सरकारकडूनही पाठपुरावा करणार आहे की या मदरशांमध्ये नेमकं काय होतं? याचीही चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वत: सरकारकडे करणार आहे. हे मदरसे शिक्षण (Madrasa education) देण्यासाठी आहेत की अतिरेक्यांना दूध पाजण्यासाठी आहेत? हे मदरसे अतिरेक्यांचे अड्डे तर झाले नाहीत ना? त्यांच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जातं. त्यांना खतपाणी टाकलं जातं. देशविरोधी कामं करण्यासाठी या मदरशांचा वापर केला जातो. असा परखड सवाल मंत्री तथा नितेश राणे यांनी सोमवारी, १० फेब्रुवारी रोजी अक्कलकुवा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत (Nitesh Rane press conference) उपस्थित केला. (Nitesh Rane)
(हेही वाचा – Pulwama attack : १४ फेब्रुवारीला झाला होता पुलवामा हल्ला; किती जवान झाले हुतात्मा? वाचा चित्तथरारक कथा!)
नितेश राणे पुढे म्हणाले की, राज्य सरकारकडून राज्यात असलेल्या सर्व मदरशांची सखोल चौकशी व्हावी. आतमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात यावं. मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या मदरशांमध्ये अतिरेक्यांना पोसण्याचं काम होत असेल, तर असे मदरसे आम्हाला कशाला पाहिजेत? यमनचा नागरिक मदरशांमध्ये सापडणं म्हणजे किती मोठा धोका आहे? असा सवाल ही नितेश राणे यांनी उपस्थित केला.
नेमके काय म्हणाले राणे?
मंत्री नीतेश राणे म्हणाले की, खरंच सर्व धर्म समभाव आहे तर काही वर्षांपूर्वी एक हिंदू शिक्षक (Hindu Teachar) मदरश्यामध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिरला म्हणून त्याला चाकूने भोसकले जाते. त्याच्यावर हल्ला केला जातो. या मुद्द्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले आहे. या मदरश्याच्या निमित्ताने एक यमनचा अतिरेकी विचाराचा नागरिक सापडला आहे. तसाच विशालगडवरही आपण ऐकले की तिथल्या मदरश्यामध्ये अतिरेकी तिथे राहून गेले आहेत. देशविरोधात कारवाईतील अतिरेकी तथे सापडला होता. नंदुरबारमधील मदरश्याच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरश्यावर प्रश्न उपस्थित करायचा आहे.
(हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला अजूनही आशा भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची)
मदरसे म्हणजे अतिरेक्यांचे अड्डेतर झाले नाही ना?
नितेश राणे म्हणाले की, हे मदरसे म्हणजे अतिरेक्यांचे अड्डेतर झाले नाही ना. ज्यात अतिरेक्यांना मोठे केले जाते. त्यांना खत पाणी देत देशविरोधी ताकदींना देशाविरोधात वापरण्यासाठी ह्या मदरश्यांचा वापर केला जातो. राज्यातील सर्वच मदरश्यांची सखोल चौकशी करत सर्च ऑपरेशन आतमध्ये करण्यात यावे. प्रत्येक मदरश्यात आत काय सुरू आहे. यात जर अतिरेक्यांना पासेले जात असेल तर हे मदरसे आम्हाला हवेत कशाला. आता नंदुरबारच्या मदरश्यात यमनचा नागरिक सापडतो हा केवढा मोठा धोका आहे. ह्यात महाराष्ट्र सरकार म्हणून भूमिका घ्यावी असे पत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे. असे विधान मंत्री नितेश राणे यांनी केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community