काँग्रेस महाआघाडीचा प्रवास थांबवण्याच्या तयारीत?

कामगार कायदे मोडीत काढत मालक धार्जिणे कायदे बनवून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार करीत असून केंद्राचे कामगार विरोधी कायदे महाराष्ट्र राज्यात लागू होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे, त्याकरता पक्षाची शक्तीस्थळे आतापासूनच मजबूत करण्याकरता इंटकला मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या झूम बैठकीत ते बोलत होते. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीचा प्रवास भविष्यात थांबविण्याचा विचार सुरु आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

केंद्राचे कामगार विरोधी कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही!

कामगार कायदे मोडीत काढीत मालक धार्जिणे कायदे बनवून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार करीत असून केंद्राचे कामगार विरोधी कायदे महाराष्ट्र राज्यात लागू होऊ देणार नाही. तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळापासून इंटकच्या सूचनेवरून अनेक कामगार हिताचे कायदे बनविले आहेत. सध्या केंद्र सरकार मात्र शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे करीत आहे. या विरोधात काँग्रेस लढा देण्याचे काम करीत असून काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याचे पटोले म्हणाले. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस संघटनेचा 74 वा वर्धापन दिन पार पडला. त्यानिमित्त झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारणीच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या समस्या, कामगारांची होणारी हालअपेष्टा, सरकारचे धोरण, काँग्रेस पक्षाकडून इंटकला मिळणारी प्रतिसाद तसेच शासनाच्या विविध मंडळ, महामंडळावर इंटकला प्रतिनिधित्व मिळावे यावर चर्चा झाली.

(हेही वाचा : कोरोना नियंत्रणाचे आभासी चित्र उभे करू नका! देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )

या बैठकीत इंटकचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी काँग्रेस पक्ष व इंटकची स्थापना आणि संबंध याची सविस्तर माहिती देऊन काँग्रेस हितासाठी इंटकला महत्त्व देण्याचे व विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, तसेच इंटकच्या पदाधिकाऱ्यांना शासनाच्या विविध मंडळ, महामंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here