कोरोना झाल्याने फडणवीसांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार का?

131

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक म्हणजे भाजप आणि शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी प्रत्येक मत हे महत्वाचे असणार आहे. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने ते या निवडणुकीत मतदान करू शकणार की नाही, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

असा आहे नियम

देवेंद्र फडणवीस यांना रविवारी कोरानाची लागण झाल्यामुळे ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. राज्यसभेची निवडणूक ही 10 जून रोजी होणार आहे. पण होम आयसोलेशनमध्ये असल्यामुळे फडणवीसांना या निवडणुकीत मतदान करता येणार की नाही, अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे. पण याबाबतच आता माहिती समोर येत आहे. सध्याच्या नियमानुसार, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला 3 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणे गरजेचे आहे. त्यानंतर तिस-या दिवशी कोरोना चाचणी केल्यानंतर जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच व्यक्तीला घराबाहेर जाण्याची परवानगी आहे.

(हेही वाचाः देवेंद्र फडणवीसांना कोरोना; ट्विटवर आवाहन करत म्हणाले, सर्वांनी काळजी घ्या!)

निवडणूक आयोग घेणार निर्णय

पण, समजा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीला पुन्हा होम आयसोलेटेड व्हावे लागते. जोपर्यंत कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला घराबाहेर पडण्याची मुभा नाही. यानुसार देवेंद्र फडणवीस यांची तिस-या दिवशी कोरोना चाचणी झाल्यानंतर जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना राज्यसभा निवडणुकीला जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

पण जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर मात्र फडणवीसांना मतदान करालया जाण्यास अडचण निर्माण होऊ शकते. मात्र असे झाल्यास त्यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचा संपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हाती असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.