एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरोधी पक्ष नेते? अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून ती चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते.
४ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कुछ काला है. ते पत्रकार मला म्हणाले की भाजपाचीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावे, त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच. बाकी सगळे साफ.
(हेही वाचा – Tripura तील हॉटेलमध्ये बांगलादेशी पर्यटकांना राहण्यास बंदी; हॉटेल ऑनर्स असोसिएशनचा मोठा निर्णय)
तसेच होतांना दिसतंय शिंदे विरोधी पक्षात ? विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपाचाच का कट सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष, विरोधी पक्ष नेताच अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरं न वाटणे ही भाजपा ची स्क्रिप्ट. अशा प्रकारचे स्टेटमेंट करून अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. विशेष म्हणजे अंजली दामनिया सवंग प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे विविध दावे करत असतात.
कोण आहेत अंजली दमानिया ?
अंजली दमानिया (Anjali Damania) एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. २०१२ मध्ये त्यांनी कोंढाणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. त्या काळात त्या आम आदमी पक्षाच्या सदस्य होत्या. त्यांनी भाजपाचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर व्यावसायिक संबंध ठेवण्याचा आरोप केला. २०१४ मध्ये त्यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली, पण पराभव झाला. २०१५ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यानंतर पक्ष सोडला.
विरोधीपक्ष नेतेच जातात भाजपात
२०१४ पासून सगळे विरोधी पक्षनेते भाजपाने आपल्या कळपात खेचून नेले परंतु मग यावेळी तर विरोधी पक्षनेता स्वतः भाजपाच नेमत आहे. २०१४ साली युतीची सत्ता आल्यानंतर काही दिवस शिवसेना सत्तेत सामील झाली नव्हती. तेव्हा विरोधीपक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काम पाहिले होते. नंतरच्या काळात शिवसेना तसेच सामील झाली. तदनंतर झालेले विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील देखील आता भाजपावासी झाले आहेत.
असे झाले तरी काही प्रश्न अनुत्तरीत
पण हे सगळे घडत असताना महाविकास आघाडीचे नेते नेमके काय करतील ?, याचा खुलासा अंजली दमानिया यांनी केला नाही. त्याचबरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विरोधी पक्षनेते पदावर बसविणे इतके सहज आणि सोपे आहे का ?, ५७ आमदार निवडून आणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इतक्या सहजासहजी विरोधी पक्षनेते पदावर जाऊन बसतील का ?, त्यातून फक्त महाविकास आघाडी साफ होण्यापलीकडे भाजपाला दुसरा कोणता फायदा तरी होईल का ?, या संदर्भात देखील त्यांनी कुठले भाष्य केले नाही. त्यामुळे फक्त राजकीय असं करायचे आणि राजकीय धुराळा उडवायचा येवढाच उद्देश्य यामागे दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community